चंदननगर पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : गांजा विक्री करणाऱ्या परप्रांतीय आरोपींना बेड्या ठोकण्यात चंदननगर पोलिसांना यश आले आहे.
सागर कुमार (वय २३ वर्षे, रा. ग्राम गोरीडी, पोस्ट-खमरीया, तहसील औराई, जिल्हा संत बिदास नगर भदोई, राज्य-उत्तर प्रदेश), शिवम सरोज (वय २२ वर्षे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून एकुण पावणेतीन किलो गांजासह मोबाईल व इतर असा एकुण ६९,४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चंदननगर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते. पोलीस अंमलदार नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड यांना माहिती मिळाली की, दोन व्यक्ती नागपाल रोड, चंदननगर येथे गांजा विकण्यासाठी येणार आहे. ही माहिती त्यांनी वरीष्ठांना कळविली असता त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे कारवाई करण्याकरीता टीम रवाना होऊन त्यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पोहचुन आडबाजुस थांबुन पाहणी केली. सायंकाळच्या सुमारास माहितीतल्या ठिकाणी त्या वर्णनाची व्यक्ती दिसून आल्याने पोलीस स्टाफने त्यांना जागीच पकडले. त्यांचे नाव पत्ता विचारले असता व सागर कुमार याच्या ताब्यातील प्रवासी सॅकबॅग तपासली असता त्यामध्ये गांजा असल्याचे दिसून आले. त्यांना पुढील कारवाईसाठी चंदननगर पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उप आयुक्त, परि.४ विजयकुमार मगर, सहायक. पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलिस स्टेशनच्या मनिषा पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने, पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे,पोलीस अंमलदार महेश नाणेकर, विकास कदम, दिलावर सय्यद, श्रीकांत शेंडे, अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, विष्णु गोणे, सचिन कुटे, शिवाजी धांडे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर, शेखर शिंदे, यांनी केलेली आहे.
