महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम : प्रा. अरुण गाढवे यांची आई कावेरी गाढवे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त ‘स्मरणआक्का’ व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले आहे.
ही व्याख्यानमाला ८,९,१० फेब्रुवारी सायं. ७ वाजता शंभूराजे विचारमंच, नगर परिषद समोर, भूम जि. धाराशिव येथे होणार आहे. दि. ८ फेब्रुवारी सायंकाळी ७.०० वाजता व्याख्याते अरविंद जगताप यांचे ‘गोष्ट छोटी डोंगरा एवढी’ हे व्याख्यान होणार आहे. व्याख्यानमालेचे उदघाटन लखोजी राजेजाधव यांचे वंशज तथा सभापती पं.स.. सिंदखेडराजा जि. बुलढाणा शिवाजीराव राजेजाधव यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संजय (नाना) गाढवे असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी वैशाली पाटील, अध्यक्ष, आष्टी तालुका शिक्षण प्रसारकमंडळ, आष्टी हांबर्ड, ICICI बैंकचे व्यवस्थापक सिध्देश्वर कसबे उपस्थित असणार आहेत. दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.०० वाजता व्याख्याते संस्थापक बनसोडस् ग्रुप ऑफ एज्युकेशनचे प्रा.डॉ. रविंद्र बनसोड यांचे “तुका आकाशा एवढा” हे व्याख्यान होणार आहे. यावेळी शंकरराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण चंदनशिव, उपविभागीय पोलिस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ, तहसीलदार सचिन वाडे, मुख्याधिकारी, न.प. गेवराई विशाल भोसले, पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक अलीम शेख उपस्थित राहणार आहेत. दि. १० फेब्रुवारी सायंकाळी ७.०० वाजता व्याख्याते जगविख्यात प्लॅस्टिक सर्जन डॉ. विठ्ठलराव लहाने यांचे “मायबापें केवळ काशी” हे व्याख्यान होणार आहे. यावेळी आरोग्यदूत डॉ. राहुल घुले मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, अस्थिरोग तज्ञ डॉ. तुकाराम विधाते, बालरोग तज्ञ डॉ. प्रविण डोरले उपस्थित राहणार आहेत.
