महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम : डॉ. राहुल घुले यांच्या फाऊंडेशनतर्फे शेतकरी बांधवांच्या अडचणी लक्षात घेता मोफत शेतीच्या बांधावरून ते एमएसईबी कार्यालयापर्यंत मोफत डीपी वाहतूकीची व्यवस्था करण्यात आली आहे. डीपी दुरुस्त झाल्यावर एमएसईबी कार्यालय ते शेतीच्या बांध्यापर्यंत परत वाहतुकीसाठी मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत 55 पेक्षा अधिक डीपी उचलण्यात आले आहेत. सोनारी ता. परांडा येथील शेतकरी बांधवांनी यासाठी आभार व्यक्त केले आहेत. भुम, परंडा, वाशी तालुक्यातील शेतकरी वर्गातून डॉ राहुल घुले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.















