महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम : तानाजीराव सावंत युवा मंच च्या वतीने माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हा परिषद हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. युवा मंच चे अध्यक्ष प्रा.डॉ.तानाजीराव सावंत व युवासेना शहर प्रमुख प्रभाकर शेंडगे यांच्या हस्ते वतीने हे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कांबळे, विकास बाबर, सचिन जाधवर, दैनिक लोकआधरचे पत्रकार रोहित चंदनशिवे, अमर भगत, मुकेश पाटील, राजे डोके, रामराजे चव्हाण, किशोर काळे, सर्वोदय स्वप्नील, ओंकार चव्हाण, यांच्यासह शाळेतील कर्मचारी व युवा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.
