महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : देशभर घेण्यात आलेल्या (एनएमएमएस) NMMS परीक्षेमध्ये बार्शी शहरातील सुप्रसिद्ध शाळा सुलाखे माध्य. व उच्चमाध्यमिक हायस्कूल येथील गुणवंत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या शाळेतील एकून ३० गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. एनएमएमएस (NMMS) म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप ही एक प्रकारची शिष्यवृत्ती आहे जी इयत्ता ८ वी नंतर पात्र विद्यार्थ्याला त्याच्या पुढील शिक्षणासाठी दिली जाते.
या मधून वार्षिक साधारण १२ हजार रुपये मुलांना स्कॉलरशिप मिळते. या क्षेत्रातील सर्वात जास्त रक्कम देणारी स्कॉलरशिप आहे.
तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अधिकार प्रदान करणे हे या योजने मार्फत सरकारचे उद्दिष्ट आहे. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर यांनी दिली.
या सर्व विद्यार्थ्यांनचे उत्तम यशाबद्दल बार्शी एज्युकेशन सोसायटी बार्शी या संस्थेचे अध्यक्ष आनंद सुलाखे, सचिव अनंत कवठाळे व सर्व शिक्षक-कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
गुणवंत विद्यार्थी कु. प्रिती राजकुमार टोणगे, आर्यन धनंजय डुमने, प्रज्वल प्रदीप भोसले, कु. श्रावणी नागेश गुळमे, ओम विनोद जाधव, सार्थक रमेश शितोळे, समर्थ धनाजी सुरवसे, शुभम भास्कर मस्तुद, प्रतिक संजय कौलगे, कु. अनुष्का गणपत गाढवे, आयुष प्रशांत बुद्रुक, रविराज सर्जेराव माळी, अनमोल कैलास वाघमारे, कु. श्रेया सिद्धेश्वर बाबर, यशराज राजेंद्र पाटील, आयुषमान विशाल पवार, भगवान शिंदे, कु. साधना धनंजय वट्टमवार, आदित्य मिथुन कसबे, कु. गौरी रामेश्वर मांगडे, थर्व धनराज उपळाईकर, अमेय प्रसन्न मनगिरे, कु. श्रावणी सोमनाथ बाबर, प्रणव कपिल बडवे, विराज वैभव पाटील, प्रणव प्रमोद अंधारे, समर्थ संतोष मालवदे, माधव संजय हिंगमिरे, प्रणव मारुती गाडेकर, कु. सुयशा कार्तिकस्वामी देवमाने हे विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.