आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ससून हॉस्पीटलमधुन पळुन गेलेला मार्शल पोलिसांच्या जाळ्यात

Spread the love

सायबर पोलीसांची कामगिरी

पुणे : ससून हॉस्पीटलमधुन पळुन गेलेल्या सायबर पोलीस स्टेशनच्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. मार्शल लीलाकर, (वय २४ वर्षे, रा. आकुर्डी) याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करण्याकरीता पोलीस कोठडी घेण्यासाठी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची १३ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली होती. आरोपी पोलीस कोठडीत असताना दिनांक ११ फेब्रुवारी रोजी वैदयकीय तपासणी करीता ससून हॉस्पीटल येथे नेले असता तो ससुन रुग्णालयातून पळुन गेला.


आरोपी पळून गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची १० पथके तयार केली होती. काही पथके आरोपीच्या मागावर, रेल्वे सीसीटिव्ही फुटेज पाहण्याकरीता, तसेच आरोपीचे नातेवाईकांकडे (कात्रज, निगडी, आकुर्डी इ.) व आरोपीची मैत्रिणीकडे एक टिम तसेच आरोपीचा माग काढण्याकरीता लोणावळा, कर्जत, कल्याण येथे देखील काही टीम रवाना केल्या होत्या. या शोध कार्यास १७ फेब्रुवारी रोजी यश मिळाले.

आरोपीच्या मावशीच्या घरी येरवडा, पुणे येथे पाळत ठेवून असणारे पोलीस अंमलदार नागटिळक व महिला पोलीस अंमलदार सोनवणे यांना आरोपी त्या परिसरात आल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या तपास पथकामध्ये पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, रसाळ, मगदुम, पाटोळे व पाडवी यांनी भाग घेतला होता.


ही कारवाई पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, विक्रांत देशमुख, पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखा, अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे आर.एन. राजे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा १ सुनिल तांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन, येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील, पोलीस निरीक्षक विजय खोमणे व सायबर पोलीस स्टेशन कडील तसेच गुन्हे शाखेकडील शोध पथकातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी शोध मोहिम यशस्वी रित्या पार पाडली आहे.