लोणीकंद पोलीस स्टेशनची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणाऱ्या, दहशत निर्माण करणाऱ्या दोन गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. लोणीकंद पोलिसांनी ही कारवाई केली.
लोणीकंद पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार गौरव ऊर्फ गोटया महादेव सातव (वय ३१ वर्षे रा. डोमखेलवस्ती आव्हाळवाडी ता. हवेली जि. पुणे) व महेंद्र संभाजी कुटे (वय. ३८ वर्षे रा. आव्हाळवाडी ता. हवेली जि.पुणे) यांस पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४, पुणे शहर यांनी पुणे जिल्ह्यातुन अनुक्रमे दीड वर्षाकरीता व एक वर्षाकरीता तडीपार केले आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील आकाळवाडी, वाघोली तसेच आसपासच्या भागात दहशत निर्माण करून लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणाऱ्या, दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवु नये तसेच सदर सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने या दोन्ही गुन्हेगारांवर सहा. पोलीस आयुक्त संजय पाटील, लोणीकंद पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत कार्यगते यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडू शुभम सातव यांनी सदर सराईत गुन्हेगारावर दाखल गुनद्यांचा अभिलेख तपासुन सदर इसम यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांना प्रस्ताव पाठविला असता विजयकुमार मगर यांनी पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन अनुक्रमे दीड वर्ष व एक वर्षाकरीता तडीपार कारवाई केली आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहा. पोलीस आयुका संजय पाटील, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित करइंगळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक किलास करे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडू शुभम सातव यांनी केली आहे.
