महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : सोलापूर तालुका, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळेगाव तांडा ता. दक्षिण सोलापूर येथील सालकी वेअर हॉऊसच्या पुर्व बाजुस असलेल्या चिलारीच्या झाडाझुडपाच्या आडोशाला चोरून अवैध गावंठी दारूच्या हातभट्टया वर छापे टाकुन कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर संकेत देवळेकर, यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली आहे.
लोकसभा निवडणुक 2024 मध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवुन कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. चोरून अवैधरित्या चालणाऱ्या देशी दारूच्या हातभट्टयावर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 2 लाख 8 हजार रूपये किंमतीचे 6400 हजार लिटर गुळमिश्रीत रसायन, 20 प्लॅस्टीक बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावंठी हातभट्टी दारू तयार करण्याकरीता लागणाऱ्या साहित्यासह अवैधरित्या दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून प्लॅस्टीक बॅरेल जागीच फोडुन त्यातील गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे.
चिलारीच्या झाडाझुडपाच्या आडोशाला चोरून अवैध गावंठी दारूच्या हातभट्टया उध्दवस्त केलेल्या ठिकाणी एकूण 3 व्यक्तीविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार याच्याकडुन होत आहे. यापुर्वी देखील सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणाऱ्य अवैध देशी गावंठी दारूच्या हातभट्टया उदध्वस्त करून कारवाई करून संबंधीत व्यक्ती विरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यापुढेही अशा व इतर प्रकारच्या चोरून अवैध व्यवसाय करणा-या गुन्हेगारी अभिलेख पडताळुन त्यांचे विरूध्द हद्दपारची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम चालु असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर संकेत देवळेकर, यांनी सांगितले आहे. छापा कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बजावली आहे.
