आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुणे पोलिसांनी केले 400 किलो ड्रग्स जप्त

Spread the love

एम.डी. ड्रग्ज रॅकेट चालवणारी आंतरराष्ट्रीय टोळी जाळ्यात

पुणे : कोट्यवधीचे अमली पदार्थ विकणाऱ्या एम.डी. ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.

वैभव उर्फ पिंटया माने (रा. पुणे) हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) अजय करोसिया अशी गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून अनुक्रमे १ कोटी रुपये किमतीचा ५०० ग्रॅम इतक्या वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, १ कोटी रुपये किंमतीचा क्रिस्टल पावडर स्वरुपातील ५०० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, १ कोटी ५० लाख रूपये किंमतीचे ७५० ग्रॅम वजनाचे एमडी गोडाऊनमध्ये, १ कोटी किमतीचे ५०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन अंमली पदार्थ, असा एकुण १ कोटी 8 लाख १७ हजार २०० रुपये, तसेच पुणे येथील गोडाऊन मधून ३ कोटी ५८ लाख २८ हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज पकडला आहे. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी अंमली पदार्थाची तस्करी करणारे गुन्हेगार यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी कठोर पाऊल उचलण्यासाठी सुचना दिली. त्याप्रमाणे अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त गुन्हे यांनी मार्गदर्शन करुन त्याप्रमाणे आदेश दिले.

त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट-१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, त्यांच्याकडील अधिकारी व अंमलदार असे रात्रीच्या वेळी हद्दीत गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार विठ्ठल सांळुखे यांना माहिती मिळाली की, २७६, सोमवार पेठच्या समोर एक पांढऱ्या रंगाची इर्टीगा कार नं. एम एच. १२ यु.जे. ४०८१ यामध्ये ड्रायव्हींग सीटवर एक व्यक्ती बसलेला दिसला व त्याच्या शेजारच्या सीटवर पोलीस अभिलेखावरील आरोपी वैभव उर्फ पिंटया माने हा बसलेला दिसला. आरोपी हा रेकॉर्डवरील असल्याने व त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे युनिट-१ कडील अधिकारी व स्टाफने या ठिकाणी जाऊन कार थांबवून अधिक चौकशी केली. त्यांचे बोलणे अधिक संशयास्पद वाटल्याने त्यांची पंचासमक्ष झडती घेतली. त्यांच्या कब्जातून अंमली पदार्थ मिळून आले.

कारचालक अजय करोसिया यांना जागीच ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींकडे कसुन चौकशी केली असता वैभव माने एम डी देणाऱ्या व्यक्तीचे नाव हैदर शेख सांगितले. त्यानुसार गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार त्यांच्या एकुण ५ टीम विश्रांतवाडी भागात विविध ठिकाणी रवाना केल्या असता हैदर शेख हा विश्रांतवाडी परिसरात मिळून आला. त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कब्जात मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ मिळुन आला. त्याच प्रमाणे त्याच्या झडतीमध्ये एक चावी मिळून आली. त्याबाबत त्याच्याकडे अधिक तपास करता ही चावी ही त्याच्या विश्रांतवाडी, परिसरात असलेल्या एक पत्र्याचे गोडाऊनची आहे असे सांगितले. या ठिकाणी गोडाऊनची पहाणी केली असता एमडी गोडाऊनमध्ये मिळून आले. त्याच प्रमाणे या ठिकाणी २०० ते ३०० संशयास्पद पोती मिळून आली. त्यामध्ये मीठ असल्याचे आढळून आले आहे. परंतु सर्व पोत्यांमध्ये एम.डी. आहे किंवा नाही याबाबत गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तपासणी करीत आहेत. ताब्यातील हैदर शेख याच्याकडे नमुद मेफेड्रॉन अंमली पदार्थ कोणाकडुन आणला? याबाबत विचारणा केली असता, त्याने एमडी अंमली पदार्थ हा परदेशी नागरीक यांनी मला विक्रीकरिता दिला असल्याचे सांगितले.


आरोपी वैभव माने व अजय करोसिया यांच्या ताब्यात अमली पदार्थ सापडून आला आहे. मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीकरिता हैदर शेख तसेच इसम नामे-हैदर नुर शेख याने दाखविलेल्या पुणे येथील पत्र्याचे गोडावुन मध्ये साठवणुक केलेला माल जप्त करण्यात आला आहे. यातील अटक आरोपीपैकी वैभव माने व हैदर शेख हे पुणे पोलीस अभिलेखावरील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उप- आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, सुनिल तांबे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे २ चे सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद युनिट ०१, अजय वाघमारे, राजेंद्र लांडगे, अनिता हिवरकर, विनायक गायकवाड, सपोनि बाबर, गायकवाड, पोलीस उप निरीक्षक रमेश तापकीर, शेळके, गोरे, कोळेकर, मगदुम, देव, नाईक, जाधव, शिंदे, मोकाशी, पोलीस अंमलदार विठ्ठल सांळुखे, अभिनव लडकत, दता सोनावणे, निलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशीकात दरेकर, शुभम देसाई, शंकर कुंभार, आय्याज दड्डीकर, सलिन वाडेकर, संतोष देशपांडे, निखिल जाधव यांनी केली आहे.