महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या सोलापूर , धाराशीव व बीड जिल्ह्यातील सेवाभावी संस्थेच्या पाच माध्यमिक शाळेच्या विकासासाठी प्रविण मसालेवाले ट्रस्टने एक कोटी रूपयांचा “मॉडेल स्कुल डेव्हलपमेंट” हा संयुक्त प्रोजेक्ट तयार केला.
पाच वर्षाच्या प्रोजेक्ट अंतर्गत या शाळांना ट्रस्टने सुमारे पंचाहत्तर लाखांचे अर्थिक साह्य केले आहे. या प्रोजेक्ट मधून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी ग्रंथालयाची पुस्तके, स्पर्धा परीक्षेची पुस्तके, विज्ञान प्रयोगशाळा, स्मार्ट बोर्ड व संगणक प्रयोगशाळा, कला, क्रीडा व सांस्कृतिक साठी संगीत व क्रीडा साहित्य, व्यावसाय शिक्षणासाठी मल्टी स्कील कार्यशाळा साहित्य तसेच शाळांच्या भौतिक सुविधात सौर उर्जा सयंत्र व जल शुद्धीकरण सयंत्र या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
मॉडेल स्कुल प्रोजेक्ट अंतर्गत शाळा
1.श्री दत्तप्रशाला मोहोळ रेल्वेस्टेशन, कोळेगाव ता. मोहोळ जि. सोलापूर.
2.अंबिका विद्यामंदिर शिरापूर ता. मोहोळ जि. सोलापूर.
3.अंतरगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंतरगाव, ता. भूम जि. धाराशीव.
4.स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, मुगगाव ता. पाटोदा जि. बीड.
5.जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गांजपूर ता. धारूर जि. बीड.
