स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : मोक्का गुन्हयातील बार्शी न्यायालयातुन पलायन झालेल्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
गुन्हयात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी याला 7 फेब्रुवारी रोजी बार्शीच्या न्यायालयात हजर करुन पुन्हा जिल्हा कारागृह येथे नेत असताना आरोपीने नैसर्गिक विधीचा बहाणा करुन बार्शी न्यायालयातुन पळ काढला होता.
बार्शी शहर पोलीस ठाणे येथे आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द सोलापूर ग्रामीण जिल्हयातील विविध पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहे.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी घटनेची गांर्भीयाने दखल घेतली. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांना आरोपीचा तात्काळ शोध घेण्याबाबत सुचना दिल्या.
सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील धनंजय पोरे व सुरज निंबाळकर यांचे पथक शोध घेत होते. आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा बार्शी तालुक्यातील लोडोळे गावाशेजारील आरोपीच्या नातेवाईंकाच्या घरी, शेतामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली.
माहितीप्रमाणे धनंजय पोरे व सुरज निंबाळकर यांच्या पथकाने लोडोळे गावातील आरोपीच्या नातेवाईंकाच्या घरी, शेतामध्ये सापळा रचुन आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपी यास बार्शी शहर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात पुढील कायदेशीर कारवाई करिता देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक, शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली यांच्या टीममधील ग्रेड-पोसई – राजेश गायकवाड, महमद इसाक मुजावर, श्रीकांत गायकवाड, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, यश देवकते, अक्षय डोंगरे, सतीश कापरे, यांनी बजावली आहे.
