1 कोटी 36 लाख 83 हजार 500 रुपये किमतीचा गांजा जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
सोलापूर : ओरीसा, आंध्रप्रदेश या राज्यातुन गांजा या अंमली पदार्थाची चोरटी वाहतुक सोलापूर ग्रामीण जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 65 वरुन होत असल्याची माहिती सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेस प्राप्त झाली होती.
पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी माहितीच्या आधारे अशा प्रकारे वाहतुक करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, यांना सुचना दिल्या.
सुचनेप्रमाणे सुरेश निंबाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे धनंजय पोरे व सुरज निंबाळकर यांच्या पथकला कारवाई करण्याबाबत आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेकडील विजयकुमार भरले यांना माहिती मिळाली की, 19 फेब्रुवारी रोजी सोलापूर तालुका हद्दीतुन एक चार चाकी वाहनातुन दोन व्यक्ती गांजा हा अंमली पदार्थ आंध्रप्रदेश मधुन घेऊन बारामतीकडे जाणार आहे.
या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील सुरेश निंबाळकर, धनंजय पोरे व सुरज निंबाळकर व पथकाने सोलापूर ते पुणे जाणाऱ्या रोडवर कोंडी गावच्या हद्दीत सिध्देश्वर हॉटेल जवळील पुलावर सापळा रचला.
माहितीच्या वाहनाचा पाठलाग करुन दोन आरोपींना त्यांच्या ताब्यातील अशोक लेलॅंड पिक अप क्रमांक एम.एच.- 42 बी.एफ.1926 सह ताब्यात घेतले. ताब्यातील अशोक लेलॅंड पिक अप क्रमांक एम.एच. – 42 बी. एफ. 1926 मधून 459 किलो 340 ग्रॅम गांजा किंमत रूपये व साहित्य किंमत असा एकूण 1,00,46,900/- रूपयांचा अवैध ‘‘गांजा’’ हा मादक व नशाकारक अंमली पदार्थ मिळुन आला आहे.
सोलापूर तालुका पोलिसांनी गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या गुन्हयाचा तपास धनंजय पोरे हे करीत आहेत. हा गांजा आंध्रप्रदेश राज्यातील श्रीकुलम येथुन बारामती येथे जात होता.
आरोपी याला न्यायालयाने 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे. तसेच सुरेश निंबाळकर यांना माहीती मिळाली की, टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील मोडनिंब येथील मोडनिंब ते जाधववाडी रस्त्यावरुन दोन चार चाकी वाहनामधुन काही व्यक्ती गांजा हा अंमली पदार्थ घेऊन जाणार आहेत.
या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील सुरेश निंबाळकर, धनंजय पोरे यांच्या पथकाने टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील मोडनिंब येथील मोडनिंब ते जाधववाडी रस्त्यावर सापळा रचुन पाठलाग करुन दोन वाहने त्यावरील चालकासह ताब्यात घेतली.
या ठिकाणी मिळुन आलेली ब्रीझा कार क्रं. MH-45 N 6752 व ट्रिबर कार क्रंमाक MH-45 AQ-7821 मध्ये एकुण 105 किलो 380 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ दोन्ही वाहनासह एकुण 36,36,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ गांजा ओरीसा राज्यातील गुणपुर येथुन अकलुज येथे घेऊन जात होते.
या गुन्ह्याचा तपास नागनाथ खुणे हे करीत आहेत. या गुन्हयात एकुण 4 आरोपी अटक करण्यात आली असुन सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक, शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज निंबाळकर यांच्या टीम मधील ग्रेड-पोसई- राजेश गायकवाड, महमद इसाक मुजावर, श्रीकांत गायकवाड, नारायण गोलेकर, निलंकठ जाधवर, धनाजी गाडे, परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, हरीदास पांढरे, यश देवकते, अक्षय डोंगरे, समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, समीर शेख, दिलीप थोरात, सतीश कापरे, तसेच सायबर पोलिस ठाणेकडील व्यंकटेश मोरे, रतन जाधव यांनी बजावली आहे.
