शिवाजीनगर पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : जबरी चोरी करुन धारदार हत्यार बाळगणा-या आरोपीना जेरबंद करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे.
चंद सरोदे (वय १९ वर्षे रा. राज चौक, भिम ज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा) सिध्देश शेंडगे (वय १८ वर्षे रा. सेवक चौक, भिमज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे.
व त्यांच्यासोबतच्या दोन विधी संघर्षित बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडुन गुन्ह्यात जबरी चोरी केलेला मोबाईल, धारदार हत्यार, दोन मोटार सायकल असा एकुण १,००,२५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एक व्यक्ती पायी जात असताना दोन मोटारसायकल वर चार मुलांनी येऊन तक्रारदार यांचा मोबाईल फोन हिसकावुन जबरीने चोरुन नेला होता.याचा शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक सीसीटिव्ही फुटेज तपासुन आरोपीने गुन्हा करताना वापरलेली एक मोटर सायकल तिच्यावरील खुणामुळे निश्चित करण्यात आली. तसेच पोलीस अंमलदार प्रविण धडस, सुदाम तायडे, स्पेश वाघमारे यांना माहिती मिळाली.
या अनुषंगाने पोलिस उपनिरिक्षक अजित बडे मनपा येथील ब्रिजखाली सापळा लाऊन थांबले असता गुन्हा केलेले संशयीत आरोपी सीसीटिव्ही फुटेज मधील मोटारसायकलसह तेथे आले.त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणेच ताब्यात घेतले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परी-१ संदिप सिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त वसंत कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सपोनि बाजीराव नाईक, सपोउपनि अविनाश भिवरे, पोलीस अंमलदार राजकिरण पवार, बशीर सैय्यद, आदेश चलवादी, महिला पोलीस अंमलदार स्वालेहा शेख यांनी केली आहे.
