कुख्यात गुन्हेगारांना कारागृहातच मिळाले ड्रग्जचे धडे
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : पुण्यातील ड्रग्जमध्ये ‘उडता पंजाब’च असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, या ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड मुळचा पंजाबमधील आहे. परंतु, तो कुटूंबियासह इंग्लड वासिय झाला, अशी माहिती समोर आली आहे.
त्याचा शोध आता पोलिसांकडून युद्ध पातळीवर घेतला जात आहे. दरम्यान दिल्लीत पकडलेले ९७० किलो एमडी हे देशाबाहेर ‘इम्पोर्ट’ केले जाणार होते, अशी माहिती समोर आली असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले. त्यासोबतच मास्टरमाईंडने कुरकुंभच्या कंपनीतून ३ महिन्यात २ हजार किलो एमडीचे उत्पादन करण्यास सांगितले होते. त्यानूसार, हे उत्पादन झाले. पण, पुणे पोलिसांनी ‘सुतावरून स्वर्ग गाठत’ आतापर्यंत १७०० किलो एमडी पकडले आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी पुण्याच्या मध्यभागातून कुख्यात गुन्हेगार वैभव उर्फ पिंट्या मानेला (वय ४२) पकडले. त्याच्याकडे ५०० ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळला. चौकशीतून हैदर शेखची (वय ४०) माहिती मिळाली. मोबाईल बंदकरून गायब झालेल्या हैदरला विश्रांतवाडीमधून काही तासात पकडले. दोघांकडून पोलिसांनी सव्वा किलो ड्रग्ज जप्त केले. तर २ गोडाऊन आढळले. तेथे ५५ किलो ड्रग्ज मिळाले. त्यानंतर आणखी खोलवर जात ड्रग्जबाबत चौकशी केली असता कंपनी मालक भिमाजी उर्फ अनिल साबळे (वय ४५) व केमिकल इंजिनिअर युवराज भुजबळ (वय ४०) यांना ताब्यात घेतले आहे.
अटक आरोपींकडील तपास व इतर माहितीवरून पोलिसांनी पुण्यासह दिल्ली व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात छापे टाकले. पुणे पोलिसांची जवळपास १८ पथके रवाना केली. आतापर्यंतच्या तपास या सर्वांचा मास्टरमाईंड मुळचा पंजाबमधील असल्याचे समोर आले आहे.
मास्टरमाईंड २०१५ मधील ड्रग्ज तस्करीतील आरोपी
कुरकुंभ एमआयडीसीत २०१५ मध्ये ड्रग्जचे उत्पादन होत असल्याप्रकरणी कंपनीवर छापेमारी केली होती. त्यावेळी ३५० किलो ड्रग्ज पकडला होता. त्या गुन्ह्यात अटक केलेला मुळचा पंजाबचा असलेला आरोपी या ड्रग्जचा मास्टरमाईंड आहे, प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ललित पाटीलप्रमाणे कारागृहातून ड्रग्ज व्यवसायाला सुरूवात
वैभव मानेवर ३६ गुन्हे नोंद आहेत. तो एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात होता. तर, हैदर अपहरण व खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. येथे दोघांची ओळख झाली. या ओळखीनंतर त्यांची या मास्टरमाईंड व एनडीपीएसच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या आरोपीशी झाली. तेथून त्यांनी ड्रग्ज व्यवसायाची माहिती मिळाली. मास्टरमाईंडने त्यांना हे सर्व सांगितले.
अन् त्या कामगारांनी आपली भूमिका चोख बजावली…
हैदर शेखच्या विश्रांतवाडी येथील दोन गोडाऊनवर छापेमारी केल्यानंतर या ड्रग्जचे पॅकेट आले कोठून याचा तपास सुरू केला. पण, हैदरकडून काहीच माहिती मिळत नव्हती. पोलिसांनी शक्कल लढवत या पॅकेटची वाहतूक करणारे कामगार व चालक यांचा शोध घेतला. तेव्हा काही कामगार व चालक मिळाले. त्यांना पोलिसांनी विचारपूस केली व ड्रग्जचे त्याचे परिणाम याची माहिती दिली. तेव्हा त्यांनी पोलिसांना कुरकुंभ व दिल्लीत माल पोहचवला असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कुरकुंभसह दिल्लीत छापेमारी केली.
हाय कॉलिटीच पॅकिंग..!
हैदर शेख व या ड्रग्जचा मास्टरमाईंड समजल्या जाणाऱ्या पंजाबमधील ‘त्या’ने ड्रग्जची पाकिटे अत्यंत हाय कॉलिटीचे बनविले होते. त्यासाठी त्यांनी मीठाचे व्यापारी असल्याचे दाखविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोडाऊनमध्ये मीठाच्या गोण्या ठेवलेल्या होत्या. गोण्यात दहा मीठाचे पोते आणि त्यात दोन ड्रग्जची पाकिटे ठेवली होती. जेणेकरून ते कोणालाही ओळखता येऊ नये. मात्र, पोलिसांनी रात्रभर सर्च ऑपरेशन राबवत ५५ किलो ड्रग्ज जप्त केले. ती पाकिटे एकदम इम्पोर्टेड चॉकलेटला पॅकिंग येते तशा पद्धतीची होती.
दिल्लीतून ड्रग्ज इम्पोर्ट होणार होते…
पुण्यात पकडण्यात आलेल्या ड्रग्ज रॅकेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील हे ड्रग्ज दिल्ली, मुंबई, पुणे, मीराभाईंदर, हैद्राबाद, बँगलोर अशा मेट्रासिटीतत अंमली पदार्थ विकण्यात आले आहे. पाचही शहरात पुणे पोलिसांची छापेमारी सुरू आहे. विशेष म्हणजे, दिल्लीत साडे नऊशे किलो एमडीचा साठा दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून जप्त केला आहे. तो साठवणूककरून ठेवण्यात आला होता. हे ड्रग्ज दिल्लीतून इतर देशात इम्पोर्ट होणार होते, अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली.
अर्थ केमिकल कंपनी २० गुंठयात उभारली आहे. २००६ पासून येथे अनिल साबळे हे रंगात गंज लागू नये यासाठी वापरले जाणारे केमिकल ‘डायस्कलयो हेक्झाईल अमाईन नायट्रेट’ व मलेरिया रोधक औषधाचे एक रसायन बनवत होते. कंपनीत जवळपास ४० हून अधिक लोक काम करतात. परंतु जून २०२३ पासून ड्रग उत्पादन सुरु केले. या कामाला ऑक्टोंबर २०२३ पासून गती मिळाली. त्यांनी एमडी ड्रगचे उत्पादन केले. हैदर व वैभव यांच्या कारागृहातील संर्पकातील एक साथीदार साबळे याच्या संर्पकात येऊन अल्पावधीत मोठया प्रमाणात पैसे मिळवण्यासाठी हे उत्पादन सुरु केल्याचा संशय आहे. दरम्यान, या कंपनीतील ठरावीक लोकांनाच ड्रग्ज उत्पादनाबद्दल माहिती होती.
