युनिट गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : दारु पिण्याच्या पैशाकरिता घरफोडी करणाऱ्या आरोपीस मुद्देमालसह ताब्यात घेण्यात यश आले आहे. ही कारवाई युनिट-५, गुन्हे शाखेने केली आहे.
दिलीप नाईक, (वय ४७ वर्षे, रा. फ्लॅट नं २०३, विहार कॉम्प्लेक्स, म्हसोबा वस्ती, झेड कॉर्नर, मांजरी) यांना अटक करण्यात आली आहे.त्याच्याकडून ३०,५०० रुपये किमतीचा लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, लॅपटॉपबॅग व रेडमी कंपनीचा मोबाईल ताब्यात घेतले.
हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील घावटे व्हिजन बिल्डींग घावटे वस्ती मांजरी ब्रु. पुणे येथे दिवसा फिर्यादीच्या घरातील लॅपटॉप व मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले. याबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्हयाच्या घटनास्थळी गुन्हे शाखा, युनिट-५ कडील पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे व स्टाफ यांनी भेट देऊन तपास सुरू केला.
यादरम्यान पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना त्यांच्या माहितीदाराने माहिती दिली की, एक संशईत व्यक्ती याच्याकडे चोरीचा लॅपटॉप व मोबाईल असुन तो विक्री करण्यासाठी तो के.के. घुले चौक, मांजरी, पुणे येथे संशयितरित्या वावरत आहे.
या माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मांजरी येथुन एक संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने दारु पिण्याकरीता पैसे पाहिजे म्हणुन लॅपटॉप व मोबाईल फोन चोरी करुन ते विक्रीकरीता आलो असल्याचे सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे २ सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दया शेगर, पल्लवी मोरे, स्वाती गावडे, पांडुरंग कांबळे यांनी केली आहे.
