सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : पंढरपूर येथील सराईत गुन्हेगार कृष्णा नेहतराव व त्याच्या टोळीस एक वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी हे आदेश दिले.
पंढरपूर तालुक्यात कृष्णा सोमनाथ नेहतराव याने एक टोळी तयार केली होती. तो स्वतः तसेच टोळीच्या सदस्यासोबत खुनाचा प्रयत्न करणे, मारामारी करणे, दहशत माजवणे, वाळू चोरी करणे अश्या स्वरूपाचे गुन्हे करून समाजामध्ये दहशत माजवत होता.
त्याच्या टोळीमध्ये स्वप्निल अरूण आयरे, तसेच रोहित लक्ष्मण अमगराव असे सदस्य आहेत. त्यांच्या टोळीने गुन्हे करून सामाजिक स्वास्थ बिघडवले असल्याने त्यांना हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्याकडून प्राप्त होता.
या गुन्हेगारांविरुद्ध प्राप्त प्रस्तावाची पोलीस अधीक्षक यांच्या समक्ष सुनावणी होवून त्यांना सोलापूर जिल्हयातून एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे.
टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांची नावे: कृष्णा सोमनाथ नेहतराव (रा. जुनी पेठ, पंढरपूर,) स्वप्निल अरूण आयरे, (रा. चिलाईवाडी, ता. पंढरपूर,) रोहित लक्ष्मण अंमगराव, (रा. रामबाग, पंढरपूर) आगामी काळातील होणाऱ्या लोकसभा निवडणुका च्या पाश्वभुमीवर जिल्हयातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे सराईत गुन्हेगार, दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुहेगाराची माहिती पोलीस ठाणे निहाय तयार करण्यात आलेली आहे.
गुन्हेगारांच्या अभीलेख याबाबत माहिती घेवून नियोजीत प्रतिबंधक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभुमीवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे कामकाज सुरू आहे.
ही कारवाई द्वितम यावलकर,अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, अर्जुन भोसले, एस. डी. पी. ओ. पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, विश्वजित पोडके, पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे, प्रकाश भुजबळ, गोसावी, सहा.
पोलीस निरीक्षक, तसेच सपोफी निलंकठ जाधवर, पो. ना. अनिस शेख, पोलीस अंमलदार सुरज हॅबाडे, सचिन इंगळे, बंजरग बिचकुले व इतर यांनी कामकाज पाहिले आहे.
