सिंहगड रोड पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तिघांना सिंहगड रोड पोलीसांनी अटक केली आहे.
नामदेव ढेबे (वय-२२ वर्षे रा. फ्लॅट नं.३०३ मेधराज कॉम्पलेक्स, सम्राट बाजारच्या शेजारील लेन, रायकरमळा धायरी) आकाश कदम (वय २३ वर्षे रा. खडक चौक, लोणारे वस्ती, अरुण गायकवाड यांच्या घराखाली पार्कंग मध्ये धायरी) जय दयाडे (वय- १९ वर्षे रा. फ्लॅट नं.२०२ शिवसृष्टी अर्पाटमेंट, काळुबाई चौक, रायकरमळा धायरी) यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून ५०,००० रुपये किंमतीचे लोखंडी धातूचे देशी बनावटीचे एक पिस्टल, ५०० रुपये किंमतीचे दोन जीवंत काडतुसे असा एकुण ५०,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार याच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, व पोलीस स्टाप गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत होते.
तेंव्हा पोलीस उप-निरीक्षक निकेतन निंबाळकर यांना माहिती मिळाली की, रायकरमळा, ढिगारा, धायरी येथे झाडाखाली तीन व्यक्ती गावठी पिस्टल घेऊन थांबलेले आहेत. या तिघांना पकडण्यात आले.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-३ संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग आप्पासाहेब शेवाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार, सचिन गायकवाड, प्रकाश पाटील, राजु वेगरे, स्वप्निल मगर, विनायक मोहिते, मोहन मिसाळ, विजय विरणक, योगेश उदमले यांच्या पथकाने केली.
