आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सोलापूर जिल्ह्यातील दोन गुन्हेगार हद्दपार

Spread the love

सोलापूर : लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेने पार पडुन कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर क्र.2 सोलापूर यांनी एका इसमास सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हयातील तुळजापूर तालुक्यातुन तसेच दुसऱ्या इसमास सोलापूर जिल्हयातुन हद्दपार केले आहे.

कुमार प्रकाश जाधव (रा.मुळेगांवतांडा ता.दक्षिण सोलापूर जि. सोलापूर) याच्या विरूध्द दंगा करणे, सरकारी लोकसेवकाच्या सरकारी कामात अडथळा आणणे, घातक हत्यारानी दुखापत करणे वगैरे 6 गुन्हयाची नोंद आहे.

तसेच नागेश बाबु साखरे (रा.मुळेगाव ता. द. सोलापूर जि.सोलापूर) याच्याविरूध्द 4 गुन्हयांची नोंद असल्यामुळे त्या दोघांना हद्दपार केले आहे. कुमार प्रकाश जाधवला 6 महिन्याकरीता संपुर्ण सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हयातील तुळजापूर तालुक्याच्या सीमेत तसेच नागेश बाबु साखरे यास सोलापूर जिल्हयाच्या स्थळसिमेत बजावणी झाले दिनांका पासुन 3 महिन्या करीता हद्दपार केले आहे.

सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी ही माहिती दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर, पोलीस अंमलदार पैंगबर नदाफ व बोरामणी दुरक्षेत्रातील तत्कालीन पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली आहे.