मुंढवा पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : गावठी पिस्टल व राऊंड स्वतःजवळ बाळगणारा तडीपार आरोपी गजाआड करण्यात आला आहे. मुंढवा पोलीसांनी ही कामगिरी केली.
तेजस पायगुडे (वय २७ रा. फ्लॅट नं. ३०१ साई निवास, जयगंगा नगर शेजारी, लोणकरवस्ती केशवनगर मुंढवा) या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी मुंढवा पोलीस ठाण्याकडील तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आण्णासाहेब टापरे, अंमलदार, स्टाफ रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी, फरारी, तडीपार आरोपी शोध घेण्याकरिता व गुन्हे प्रतिबंधक करण्याकरीता पेट्रोलिंग करत होते.
पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी ६ च्या सुमारास लोणकर चौक, केशवनगर भागामध्ये पेट्रोलींग चालू असताना पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना माहिती प्राप्त झाली की “मुंढवा पोलीस ठाणे रेकॉर्डवरील सध्या तडिपार असणारा गुन्हेगार तेजस पायगुडे हा लोणकर पेट्रोलपंपाच्या मागे आला आहे.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांना दिली असता त्यांनी योग्य ती कायदेशीर ठोस कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे घटनास्थळी जाऊन योग्य सापळा लावून खातरजमा केली असता त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात घेतले.
सहायक पोलीस निरीक्षक आण्णासाहेब टापरे यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेस एक गावठी कट्टा मिळुन आला व अधिक झडती घेतली असता त्याच्या पँटच्या उजव्या खिशामध्ये दोन काडतुस (राऊंड) मिळुन आले.
तेजस पायगुडे हा तडीपार असताना देखील आदेशाचा भंग करुन गावठी कट्टा व राऊंडसह फिरत असल्याने फिर्याद देऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पुर्व प्रादेशिक विभाग पोलीस उप- आयुक्त, आर राजा, परिमंडळ-५ पुणे शहर सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख, हडपसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार, संतोष जगताप, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्ग, संतोष काळे, राहूल मोरे, हेमंत झुरुंगे, सचिन पाटील यांनी केली आहे.
