आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोलीस शिपायाला लाच घेताना रंगेहात पकडले

Spread the love

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई

सोलापूर : अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेल्या पोलीस शिपायास ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

दादासाहेब बोडके (पद- पोलीस शिपाई, ब.नं. ११५२, नेमणूक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे) असे पोलीस शिपायाचे नाव आहे.

तक्रारदार वापरत असलेला मोबाईल चोरीचा असल्याचे सांगून, तक्रारदार यांच्याविरुध्द मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी यातील आरोपी दादासाहेब बोडके याने तक्रारदार यांच्याकडे ५००० रुपये लाच मागितली.

लाच रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.