चिमुकल्यानी जिंकली प्रेक्षकांची मने
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अनिल डुंगरवाल
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील आदित्य बहुउद्देशीय, शैक्षणिक, सामाजिक सेवा भावी संस्था संचालित गुरुदेव इंग्लिश मेडियम स्कुल चे विविध गुण दर्शन व स्नेह संमेलन कार्यक्रम दि.10 मार्च रोजी सायंकाळी 8 वाजता संपन्न झाला.
यामध्ये लहान मुलांच्या नृत्य कलानी नागरिकांची मने जिंकली.या स्नेहसंमेलनात टी.व्ही.स्टार सोहेल व साहिल मुलानी यांच्या गीत गायनाने कार्यक्रमात रंगत आणली होती.
या कार्यक्रमाला सरपंच महेश कोळी, उपसरपंच कॉ.पंकज चव्हाण, ग्रा.प.सदस्या अंजली मोटे, सोनाली निंगुळे, आशा औताने, माजी उपसरपंच डॉ.अनंत कुलकर्णी, सारंग मोटे, डॉ.प्रशांत मोटे, संस्थेचे प्रमुख अच्युतराव डोके, प्रवीण डोके, ऍड.महेश आखाडे, जब्बार शेख, राजेंद्र आखाडे, माजी सैनिक अरुण मोटे, सुरेश लाखे, मुकुंद आखाडे, माऊली ताटे, गणेश खवले, आयुब पठाणसह यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात चिमुकल्यानी हिंदी, मराठी नव्या, जुन्या गाण्यावर, लावणी, लोकगीतावर नृत्य सादर केली. या विध्यार्थ्यांना शाळेच्या वतीने भेट वस्तू ही देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अर्चना डोके यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश इंगळे यांनी केले.
या लहान मुलांसाठी आश्विनी चव्हाण, कोळी मॅडम, आखाडे मॅडम यांनी मेहनतीने कार्यक्रम यशस्वी केला.
