आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

Spread the love

निगडी पोलिसांची कारवाई

पुणे : शस्त्राचा धाक दाखवून दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून दोन गावठी कट्टे, रिक्षा आणि मिरचीपूड असा एकूण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी गणेश तुकाराम सांगोळकर (वय 23, रा. मिलींदनगर, ओटास्कीम, निगडी), चंद्रकांत अंकुश चव्हाण (वय 36, रा. रुपीनगर, तळवडे), विनोद शिवचरण हिप्परीकर (वय 35, रा. ओटास्कीम, निगडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

तर प्रकाश चंद्रकांत धोत्रे (रा. रुपीनगर, तळवडे), पंचू तावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विनायक सुभाष मराठे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम स्मशानभूमी येथे काहीजण रिक्षा जवळ उभे असून ते दरोडा घालण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती तपास पथकाला मिळाली.

त्यानुषंगाने पोलिसांनी परिसरात पाहणी केली. त्यावेळी पाचजण स्मशानभूमीच्या पाठीमागील बाजूला रिक्षा जवळ उभे असल्याचे दिसले. पोलिसांनी सापळा लाऊन तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांचे दोन साथीदार प्रकाश आणि तावडे अंधारात पळून गेले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख करीत आहेत.