सोलापूर तालुका,पोलीस ठाणे यांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : अवैध गावंठी देशी दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करण्यात सोलापूर तालुका,पोलीस ठाणे यांना यश आले आहे. यावेळी १५ हजा ६०० लिटर गुळमिश्रीत रसायन हातभट्टी दारू जागेवरच नष्ट करण्यात आली असून २४०५ लिटर देशी हातभट्टी दारू हस्तगत करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुक – २०२४ ची प्रक्रिया शांततेत पार पाडुन निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या हद्दीतील भानुदास तांडा, सेवालालनगर, बक्षीहिप्परगा, गुळवंची व मुळेगाव तांडा या परिसरात चोरून चालणा-या अवैध हातभट्टी दारूच्या भट्टया उध्दवस्त करण्यात आल्या आहेत.
संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याकरीता पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका,पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी ही विशेष मोहीम राबविली.
चोरून अवैधरित्या गावंठी देशी दारूच्या हातभट्टीच्या ठिकाणी टाकलेल्या छापा कारवाईत एकूण ५ लाख ४२ हजार रूपये ६०० रूपये किंमतीचे त्यामध्ये १५ हजार ६०० लिटर गुळमिश्रीत रसायन, प्लॅस्टीक बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावंठी हातभट्टी दारू तयार करण्याकरीता लागणारे साहित्यासह चोरून अवैधरित्या दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून ८८ प्लॅस्टीक व २ लोखंडी बॅरेल जागीच फोडुन त्यामधील गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करून एकूण १० व्यक्तींविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यापुढेही अशाच प्रकारे लोकसभा निवडणुक -२०२४ च्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणा-या अवैध देशी गावंठी दारूच्या हातभट्टया उदध्वस्त करून संबंधीत व्यक्तींविरूध्द कारवाई करण्यात येणार आहे.
मौजे मुळेगाव तांडा, समशापुर, बक्षीहिप्परगा व सेवालालनगर तांडा ठिकाणी चोरून अवैधरित्या हातभट्टी दारूची विक्री करणा-या ४ व्यक्तींविरूध्द ४ गुन्हे दाखल करून २४०५ लिटर हातभट्टी दारू जप्त करून एकूण १ लाख ४५ हजार ४५० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच मौजे बक्षीहिप्परगा ता.द.सोलापूर येथे अवैधरित्या जुगार खेळणा-या एकूण ३ व्यक्तींविरूध्द १ गुन्हा दाखल करून त्यांच्याकडुन ७ दुचाकी मोटार सायकल वाहने, ४ मोबाईल हॅन्डसेट, १ लाख १ हजार ३४० रूपये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख ७४ हजार ३४० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
असा एकूण ११ लाख ६८ हजार ३९० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर, पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका,पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बजावली आहे.
