अबीर गुलालाची उधळण, होळीच्या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल
पुणे : अग्रवाल समाज फेडरेशन पुणे यांच्या युवा व महिला समितीच्या संयुक्त विद्यमाने होळी निमित्त जिम लाईफ टर्फ ग्राउंड कपिल नगर रामवाडी येथे ‘भव्य रंगोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विनोद शिवनारायण बन्सल, सचिव के. एल बन्सल, खजिनदार श्याम गोयल, कोअर कमिटी सदस्य नितीन अग्रवाल, महिला समिती अध्यक्षा नीता अग्रवाल आणि युवा समिती अध्यक्ष विकास गर्ग, पंकज अग्रवाल, हितेश अग्रवाल, श्रेया कनोडिया, साहिल कनोडिया, महिला समिती उपाध्यक्ष मीना देवेंद्र गोयल, सचिव उषा. तुलश्यान, कोषाध्यक्ष लक्ष्मी बन्सल, निशा अग्रवाल, दर्शना गर्ग, सुनील गर्ग व सर्व अधिकारी व समिती सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला वसंत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रेमचंद मित्तल सपत्नीक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याशिवाय शुभम ग्रुपचे राजेश अग्रवाल, चंदन नगर अग्रवाल समाजाचे राजेश सुरेंद्र कुमार अग्रवाल, संजय अग्रवाल प्रिन्स, अधिवक्ता आनंद अग्रवाल, नीलेश अग्रवाल यांच्यासह सुमारे १२०० लोकांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन होळीचा मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमात सहभागी तरुणांची संख्या लक्षणीय होती.
होळीचा हा महान सण अविस्मरणीय बनवण्यासाठी रेन डान्स, उत्कृष्ट डीजे म्युझिक, बँड पथक, डान्स आर्टिस्ट, रिअल सेल्फी पॉईंट आदींची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यावर लहान मुले, वृद्ध असो वा तरुण, सर्वांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला. मथुरा वृंदावनची लाठमार होळी हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. याशिवाय येथे फुलांची होळीही मोठ्या उत्साहात खेळण्यात आली.
लोकांनी एकमेकांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून होळीचा आनंद लुटला. एकमेकांवर रंग उधळणे, हवेत अबीर गुलाल उधळणे आणि एकमेकांच्या गालावर रंगीबेरंगी अबीर गुलाल उधळणे असा हा सिलसिला सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरू झाला आणि दुपारी दोन वाजता संपला.
कार्यक्रमादरम्यान सर्वांसाठी खास होळीच्या पदार्थांचा स्टॉल लावण्यात आला होता, ज्याचा सर्वांनी आनंद घेतला. कार्यक्रमासाठी मैदानाची व्यवस्था नीता चंद्रशेखर अग्रवाल व त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
