गुन्हे शाखा युनिट-६ ची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट-६ ला यश आले आहे.
कुणाल ऊर्फ बाब्या ठाकुर (वय २३ वर्षे रा. गोसावी वस्ती, बिराजदारनगर, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे एकुण १,५४,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करीत होते.
तेव्हा युनिट कडील अंमलदारास माहिती मिळाली की गुन्हेगार कुणाल ऊर्फ बाब्या ठाकुर हा इंद्रप्रस्थ लॉन्स कडून भापकर मळ्याकडील जाणाऱ्या रस्त्यावर येणार आहे. त्याच्याकडे चोरीचे दागिने आहेत. ही माहिती पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६ चे उल्हास कदम यांना कळविली असता त्यांनी या ठिकाणाच्या जवळ जाऊन आडबाजूस थांबून खात्री केली.
तेव्हा हा व्यक्ती संशयीतरित्या तेथे उभा असल्याचे दिसले. त्याला युनिटकडील पथकाने पकडले. युनिटकडील पोलीस पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याची हालचाल संशयास्पद वाटली. त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने मिळुन आल्याने ते जप्त केले आहे.
तसेच त्याने वानवडी व लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत तीन ठिकाणी घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी विरुद्ध यापुर्वी येरवडा, हडपसर, लोणावळा इत्यादी पोलीस स्टेशन येथे घर फोडीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस उपआयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे २ सतिश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, ऋषिकेश व्यवहारे, नितीन घाडगे, शेखर काटे ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.
