महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : बार्शी रेड लाईट एरियातील महिलांना लेखक सचिन वायकुळे यांनी आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. बार्शीत देहविक्र करणाऱ्या रेड लाईड एरियातील महिलांनी येणाऱ्या काळात आरोग्याबाबत काळजी घ्यावी, वेळोवेळी तपासणी कराव्यात तसेच पोलिसांच्या यादीवर असलेल्या गुन्हेगाराकडून याठिकाणी गुन्हे घडण्याचे निमित्त होणार नाही यासाठीही दक्ष रहावे, असे आवाहन वायकुळे यांनी या महिलांना केले.
बार्शीतील रेड लाईट एरियात देहविक्रय करणाऱ्या महिलांची स्मार्ट अॅकॅडमीत बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित महिलांना सचिन वायकुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना सचिन वायकुळे म्हणाले, जीव मुठीत घेऊन या व्यवसायात उतरलेल्या महिलांच्या आयुष्याचा उत्तरार्ध आर्थिक संकटांनी घेरल्याची अनेक उदाहरणे आजवर समोर आली आहेत.
काही महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना मोठा त्रास नंतरच्या काळात सहन करावा लागला. ही पार्शवभूमी पाहता यापुढे अशा बाबी आपल्या वाट्याला येऊ नयेत यासाठी दक्षता बाळगावी. एकमेकांविरुध्द संघर्ष करून प्रश्न सुटणार नाहीत.
आशावेळी प्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी वेळावेळी पोलिस प्रशासानाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्या. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यासाठी या काळात या कोणत्याही कारणावरून वाद होणार नाही यासाठी महिलांनी काळजी घ्यावी.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या एरियात काम करणाऱ्या परंतु गंभीर आजार असलेल्या महिलांनी आरोग्याच्या वेळोवेळी तपासण्या करून घ्यायला हव्यात. अल्पवयीन मुली या व्यवसायात येणार नाहीत याची काळजी याठिकाणी काम करणाऱ्या सर्वच महिलांनी घ्यावी, असे आवाहन यावेळी सर्व उपस्थित महिलांना करण्यात आले.
पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनीही काही महिलांना बोलावून याबाबतच्या सूचना दिल्या. रेड लाईट एरियात देहविक्रय करणाऱ्या महिलांचे जीवन अस्थिर आहे. ज्या महिलांना यातून बाहेर पडण्याची इच्छा आहे, आशा महिलांचे पुनर्वसन करण्यास आम्ही तत्पर आहोत.
ज्या महिलांना यातून बाहेर येऊन दुसरा उद्योग व्यवसाय करायची मानसिकता आहे, त्या महिलांनी निश्चितच पुढे यावे अशा प्रकारचे आवाहन बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी केले.
