महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित राजर्षी शाहू लॉ कॉलेज, बार्शी या महाविद्यालयास बंगलोर येथील राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रत्यायन परिषद (नॅक) या संस्थेने ए प्लस मानांकन नॅक देण्यात आले आहे.
समितीव्दारे गठित करण्यात आलेल्या कोअर टीमचे अध्यक्ष कर्नाटक स्टेट लॉ विद्यापीठ, कनार्टकाचे माजी कुलगुरू डॉ. पी. ईश्वरा भट, समन्वयक म्हणून काश्मीर विद्यापीठ, श्रीनगर येथील लॉ विभागाचे अधिष्ठाता डॉ. महमंद हुसेन व उत्तरप्रदेश, गाझीयाबाद येथील संकल्प कॉलेज ऑफ इज्युकेशनचे प्राचार्य, डॉ. अमरजीतसिंग परीहार यांनी नॅक मुल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली.
नॅक या स्वायत्त संस्थेतर्फे देशभरातील विद्यापीठ व महाविद्यालयांचे मुल्यांकन व पुर्नमुल्यांकन करून श्रेणी देण्यात येते. नॅकने ठरवून देलेल्या निकषांची पुर्तता केल्याची तपासणी नॅक पीअर टिम मार्फत करण्यात येते.
ज्यामध्ये महाविद्यालयातील शैक्षणिक उपक्रम, भौतिक सेवा सुविधा, नवीन उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती, प्रशासकिय बाबी, विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद, विद्यार्थी समाधान सर्व्हेक्षण अशा अनेक बाबींची पाहणी करण्यात येते.
राजर्षी शाहू लॉ कॉलेजमध्ये नॅक पीअर टिमने भेट देऊन सदर बाबींची तपासणी केली व महाविद्यालयास ३.२९, CGPA व अ प्लस (A+) ग्रेड प्राप्त झाले. राजर्षी शाहू लॉ कॉलेज हे अ प्लस (A+) ग्रेड मिळविणारे महाराष्ट्रातील ग्रामिण भागातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे.
या यशामध्ये महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मागील काही महिन्यापासून अतिशय योग्य असे काम केले. नॅक पीअर टिमपुढे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, डॉ. रत्नदीप सोनकांबळे यांचे विस्तृत सादरीकरण झाले व महाविद्यालयाच्या आयक्युएसी कोऑर्डिनेटर म्हणून श्रीमती प्रा. महादेवी शिकारे यांनी काम पाहिले.
राजर्षी शाहू लॉ कॉलेजच्या या कामगिरी बद्दल शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी. टी.पाटील, जाईट सेक्रेटरी ए.पी. देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे व कार्यकारणी सदस्य यांनी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, डॉ. रत्नदीप सोनकांबळे व नॅक समन्वयक प्रा.एम.पी.शिकारे यांचेसह सर्व प्राध्यापक व प्रशासकिय कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
महाविद्यालयाच्या यशामध्ये, आमच्या मातृसंस्थेचे खुप मोठे योगदान आहे. तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अतिशय योग्य असे नियोजन करून उत्कृष्ट काम केले. आमचे महाविद्यालय तुलनेने लहान व ग्रामिण भागातील असून देखील महाविद्यालयाने योग्य असे नियोजन करून उत्कृष्ट असे मानांकन प्राप्त केले आहे. त्याचा मनस्वी आनंद होत आहे. डॉ. रत्नदिप सोनकांबळे प्र. प्राचार्य, राजर्षी शाहू लॉ कॉलेज, बार्शी.
“श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी अंतर्गत एकुण ५ महाविद्यालये आहेत. त्यापैकी A मानांकन मिळविणारे दोन व B++ मानांकन मिळविणारे दोन महाविद्यालये आहेत. A+ मानांकन मिळविणारे राजर्षी शाहू लॉ कॉलेज हे ग्रामिण भागातील विधी अभ्यासक्रमाचे एकमेव महाविद्यालय ठरले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. संस्था म्हणून प्रत्येक महाविद्यालयांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” पी.टी.पाटील, जनरलसेक्रेटरी, श्री.शि.शि.प्र.मं. , बार्शी.
