आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कलशारोहण सोहळ्यानिमित्त आठ जोडप्यांच्या हस्ते कलश, मूर्तीची महापूजा

Spread the love

पारगाव : पारगाव येथे कलशारोहण सोहळ्यानिमित्त आठ जोडप्यांच्या हस्ते कलश, मूर्तीची महापूजा करण्यात आली.

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अनिल डुंगरवाल

पारगाव येथील काही तरुणांनी पुढाकार घेत हाती घेतलेले महादेव मंदिराचे काम आता पूर्ण झाले असून, सोमवारी या मंदिराचा कलशारोहणाचा सोहळा, तसेच गणपती व नंदी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

या सोहळ्याची सुरुवात रविवारी आठ जोडप्याच्या उपस्थितीत कलश, मूर्तीची महापूजा करून झाली. महादेव मंदिराच्या कलशासह गाभाऱ्यातील काम मागील अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत होते. यासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेत अनेक दात्यांना प्रत्यक्ष भेटून व समाजमाध्यमाद्वारे आवाहन करून देणगी जमा केली.

आता हे काम पूर्णत्वास गेले आहे. सोमवारी या मंदिरात गणपती व नंदी यांच्या नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येणार असून, शिखरावर कलशारोहणही केले जाणार आहे. यासाठी नेकनूर येथील बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे यांची उपस्थिती राहणार आहे.

या मुख्य सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर जीर्णोद्धार कमिटीने केले आहे.