आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

श्रीराम नवमी निमित्त बार्शीमध्ये निघणार शोभायात्रा

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ

बार्शी : श्रीराम नवमीनिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी मध्यवर्ती उत्सव समिती बार्शी तर्फे शोभायात्रा काढण्यात येत आहे बुधवार दिनांक १७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी चार वाजता श्री भगवंत मंदिर मार्ग बार्शी येथून ही शोभायात्रा निघेल. भगवान श्रीरामाची नऊ फुटाची मूर्ती तसेच भगवान हनुमानजीची सात फुटाची मूर्ती हे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण आहे. सदर शोभायात्रा श्रीराम मंदिर भगवंत मंदिर मार्ग महाद्वार चौक ऐनापुर मारुती, तेल गिरणी चौक, शिवाजी आखाडा, एसटी स्टँड चौक, पोस्ट ऑफिस चौक, जुने पोलीस स्टेशन, पांडे चौक, नगरपालिका, तानाजी चौक, संकेश्वर उद्यान, एकविरा आई मंदिर मार्गे निघणार असून भगवंत मंदिरासमोर समारोप होईल. बार्शी शहर परिसरातील तमाम बंधू भगिनींनी आबालवृद्धानी या शोभायात्रेमध्ये सहकुटुंब सहभागी व्हावे अशी विनंती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. शोभायात्रेत सहभागी होताना महिलांनी पारंपारिक वेशभूषेत सहभागी व्हावे तसेच पुरुषांनी पांढरा शर्ट आणि भगवी टोपी परिधान करावे असे आवाहन ही समितीच्या वतीने करण्यात आले आहे.