आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

एच. व्ही. देसाई केंद्राच्या दहा विद्यार्थ्यांची यूपीएससीत बाजी

Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

पुणे : यूपीएससी परीक्षेत एच. व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्राचा दबदबा कायम असून या परीक्षेत दहा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

त्यामध्ये प्रामुख्याने तेजस सारडा UPSC रँक 128, मयूर गिरसे UPSC रँक 422, हिमांशू टेंभेकर UPSC रँक 738, गौरी देवरे UPSC रँक 759, प्रितेश बाविस्कर UPSC रँक 767, प्रतीक मंत्री UPSC 2023 रँक 786 यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांचे सातत्य, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनत, सोबतच एच. व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक निरव सुरतवाला (निरव दा) ,अरविंद राजपुरोहित, प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

संदर्भ साहित्य, लेखन कौशल्य आणि सराव पेपर यांची आयोगाच्या धर्तीवर मांडणी केली याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला, UPSC मधील शेवटचा टप्पा म्हणजे मुलखात यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून यश संपादन करण्यास खूप मोठे सहकार्य केले, तसेच इथून पुढेही असेच सहकार्य करत राहू अशी ग्वाही निरव सुरतवाला यांनी दिली.

सर्वांचे स्वप्न साकार करण्यासाठी एच. व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र सामूहिकरीत्या प्रयत्नशील आहे आणि पुढे सुद्धा राहील. विद्यार्थ्यांच्या शुभकार्यास प्रोत्साहन, आणि पुढील वाटचालीस दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष व सर्व ट्रस्टी यांच्यामार्फत खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या, अशी माहिती राजेश शहा यांनी दिली.