आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शी-परांडा रोडवर अपघात, दोन जण जागीच ठार

Spread the love

पिकअप आणि कार यांची धडक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ

बार्शी : बार्शी परांडा रोडवर हिंगणगाव पाटीजवळ पिकअप आणि फोर व्हीलर गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

पिकअप बार्शीहून परांड्याकडे जात होती. तर, फोर व्हीलर परांडा येथून बार्शीच्या दिशेने येत असताना समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे.

गणेश उर्फ छोट्या गव्हाणे आणि रणजीत देशमुख (अलीपुर रोड) बार्शी अशी मयत झालेल्यांची नावे आहेत.

पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी मिठू जगदाळे यांनी दिली.