महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त बार्शी नगरपालिकेच्या कर्मचारी संघटनेच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उदघाटन बार्शी नगरपरिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या वेळी आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद, मिळकत विभाग प्रमुख महादेव बोकेफोडे, कामगारांचे नेतृत्व अजित कांबळे, दीपक ओहळ, संदीपान कांबळे, हर्षल पवार, नेमिनाथ पवार, महादेव पवार, दत्ता पवार, दयवान कदम, संभाजी शेंडगे, दिलीप ओहोळ, निलेश खुडे, उमेश पवार उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक अर्जुन कांबळे, लोकेश काकडे, धीरज गजधने, अभयराज ओहळ, आप्पा चौगुले, वैभव बोकेफोडे, भोलेनाथ खलसे, मुकुंद पवार, नागेश कांबळे, उत्तरेश्वर अवघडे, विशाल भडकवाड, प्रकाश शिंदे, बापू हणमंते, गणेश वाघमारे, गणेश बोकेफोडे, आनंद शिंदे, अमित बोकेफोडे सम्राट आलाट, परमेश्वर भोसले, मुकेश गोगले, निखिल पवार, सचिन नेटके, अजय कांबळे, अजय काकडे, मोहन तोसबड, विलास जगताप यांनी परिश्रम घेतले.
