महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : ता.वैराग येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या शिक्षकाला तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी कोहिनूर सय्यद (वय५७, रा पिंपळगाव ता भूम, जि धाराशिव) असे शिक्षकाचे नाव आहे.
शिक्षकाकडून झालेल्या विनयभंगाची माहिती पिडीतीने पालकांना सांगितली.. पालकांनी शाळेतील मुख्याध्यापक रविंद्र वाघमारे यांना या प्रकरणाबाबत सांगीतले असता मी पाहून घेतो पोलीसात तक्रार करू नका असे सांगून आरोपीच्या वाईट वागणूकीचे समर्थन केले. त्यांनतर देखील शिक्षकांने मुलीला त्रास देणे सुरूच ठेवले.
तास संपल्यानंतर पिडीतेस व वर्गातील दुस-या पिडीतेला देखील तो लज्जास्पद वागणूक देत होता. हा घडला प्रकार पिडीतेने पालकांना सांगितला. मुख्याध्यापक दाद लागू देत नसल्याने गावातील प्रतिष्ठीत लोक व पालक आरोपीला जाब विचारण्याकरिता शाळेत गेले असता मुख्याध्यापकांनी पुन्हा शिक्षकांची पाठराखण केली.
त्यामुळे शिक्षक कोहिनूर सय्यद व रविद्र वाघमारे यांच्या विरुध्द वैराग पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयाचा तपास सहायक पोलिस निरिक्षक आर.पी खांडेकर व पोलिस निरिक्षक किरण आवचर यांनी केला. या गुन्ह्यामध्ये ९ साक्षीदार तपासण्यात आले. यातील दोन्ही पिडीता मुलींची साक्ष महत्वाची ठरली.
बार्शी येथील विशेष जिल्हा न्यायाधीश एल.एस चव्हाण साहेब यांनी आरोपी याला शिक्षा ठोठावली. यातील आरोपी रविद्र वाघमारे याला सबळ पुराव्याभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. सरकार पक्षा तर्फे अॅड. राजश्री कदम यांनी काम पाहिले.
या केसमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक वैराग निवृत्ती मोरे यांनी फिर्यादी, पिडीता व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. या गुन्हयाचा तपास आर.पी खांडेकर व किरण आवचर यांनी केला.
