डॉ अरुण आंधळे , प्रा चंद्रकांत वानखेडे, ह. भ. प. रोहीणी परांजपे आणि रफिक शेख ठरले मानकरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे अहिंसा पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण आंधळे (शैक्षणिक), ज्येष्ठ कवी प्रा चंद्रकांत वानखेडे, (साहित्य), प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. रोहीणी परांजपे (समाज प्रबोधन) आणि रफिक शेख (समाज सेवा) यांना प्रदान करण्यात आले.
हे पुरस्कार महासंघाचे अध्यक्ष उमेश पाटील, संस्थापक अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया, महासंघाचे महामंत्री विजय भिलवडे, कार्याध्यक्ष श्रेयस पगारिया आणि माजी अध्यक्ष अजित पाटील, सूर्यकांत मुथियान, नितीन बेदमुथा, विलास पगारिया व सुदिन खोत, प्रा प्रकाश कटारिया, विरेंद्र जैन, तसेच कोषाध्यक्ष सुभाष ओसवाल, हितेश सुराणा संदेश गदिया, सचिन कोगनाळे, श्रेणिक मंडलेचा आणि चंदूकाका सराफ यांच्या प्रतिनिधी अश्वीनी हरसुले यांच्या हस्ते देण्यात आले.
महासंघाच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या दिवशी भव्य अहिंसा रैलीच्या समारोपानंतर आयोजित समारंभात प्र रामकृष्ण मोरे सभागृहात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. महासंघाच्या वतीने जैन आणि शाकाहारी असणारी व्यक्ती ज्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
यावेळी डॉ. आंधळे यांनी महासंघाच्या कार्याचा गौरव करून महासंघाचे आभार मानले. चंद्रकांत वानखेडे यांनी आई-वडिलांवरची त्यांची कविता सादर केली, त्यांना मिळालेला पुरस्कार परिवाराला समर्पित केला.
प्रसिद्ध प्रवचनकार आणि कीर्तनकार रोहिणी परांजपे यांनी महासंघासारख्या मोठ्या संस्थेकडून पुरस्कार मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि महासंघाचे आभार मानले, रफिक शेख यांनी भगवान महावीरांच्या तत्त्वांचा विशेष प्रभाव त्यांच्या जीवनावर असल्याचे सांगितले आणि अहिंसा, व्यसनमुक्ती, शाकाहार, शांती यासारख्या तत्वांच्या प्रचारासाठी ते नेहमीच प्रयत्न करतात असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महासंघाचे कार्याध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी केले. यानंतर स्पर्धेमध्ये आलेल्या पहिल्या तीन क्रमांकाचे पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांक सुदर्शन महिला मंडळ, द्वितीय क्रमांक आचार्य शांती सागर पाठशाला, तृतीय क्रमांक दिगंबर जैन महिला मंडळ यांनी पटकाविले.
त्यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रायोजक चंदुकाका सराफ या़च्या व्यवस्थापक अश्वीनी हरसुले, सुनीती ज्वेलर्स, प्रकाश भंडारी कुसुमताई भंडारी, अनुप नहार, सचिन सोनिग्रा यांचा सन्मान अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन केला.
कार्यक्रमासाठी थेरगाव युवक मंडळ, थेरगाव जैन युवक मंडळ यांनी परिश्रम घेतले. महेश संचेती आणि ओम संचेती यांचा स्वर आराधना हा भजन संधेचा अतिशय सुंदर कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्वाती शिरगुपे यांनी केले.
