आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जागतिक पुस्तक दिना निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ

बार्शी : श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे आज जागतिक पुस्तक दिना निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

बार्शी शहरातील युवा उद्योजक, व श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी चे संचालक. आशोक (विकी) कांकरिया यांच्या शुभ हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ हे होते.

वाचनालयाचे सेक्रेटरी आनंद पुनमिया, संचालक धिरज कुंकूलोळ, रूपेश कांकरिया, प्रमोद भंडारी, तसेच श्री जैनाश्रमचे सेक्रेटरी दिनेश श्रीश्रीमाळ हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पुनमिया यांनी केले. या वेळी वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद, साधना कन्या प्रशालाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आभार प्रदर्शन धिरज कुंकूलोळ यांनी केले. हे ग्रंथ प्रदर्शन २३ व २४ एप्रिल वाचकांसाठी, पुस्तक प्रेमी साठी दोन दिवस ठेवण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव, क्लार्क विराज पतंगे यांनी परिश्रम घेतले.