महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अनिल डुंगरवाल
पारगाव : वाशी येथील रहिवाशी आणि जोगदंड विद्यालय पारगाव घुमरा, तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सुनिता वाघमारे यांना गांधी पीस फाउंडेशनच्या वतीने मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर लाल बहादूर राणा, ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर गिरीश प्रभुणे, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर आशा पाटील व डॉक्टर प्राचार्या डॉक्टर श्वेता चौगुले यांच्या हस्ते व गांधी पीस फाउंडेशनचे भारताचे प्रभारी डॉक्टर सुनील सिंह परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत मानद डॉक्टरेट पदवीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
मानद डॉक्टरेट पदवी वाघमारे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्या या यशाबद्दल जोगानंद विद्यालय पारगावचे मुख्याध्यापक अच्युत आहिरे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
