आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला केले जेरबंद

Spread the love

विश्रामबाग पोलीसांनी सापळा रचून पकडले

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

पुणे : विश्रामबाग, शिवाजीनगर परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या प्रकरणी जयवंत ऊर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड, (वय ३८ रा. आंबेडकर वसाहत, डी.पी. रोड गणेशखिंड) याला पोलिसांनी अटक केली आहे. विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये घरफोडी चोरीच्या गुन्हयामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक बरुरे व अंमलदार यांना सुचना दिल्या.

घरफोडी झालेल्या घटनास्थळावर भेट देवुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून घरफोडी गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेतला. आरोपी पुणे रेल्वे स्टेशन या परिसरात असल्याचे तपास पथकातील अधिकाऱ्यांना समजले. विश्रामबाग, शिवाजीनगर तसेच पोलीस स्टेशन हद्दीमधील सीसीटीव्ही फुटेज वरुन आरोपीचा माग काढत सतत चार दिवस कसून शोध घेतला.

सापळा रचुन अतिशय शिताफीने पुणे रेल्वे स्टेशन परिसरात ताब्यात घेतले. त्यानेच दोन घरफोडी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून चार लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
पोलीस आयुक्त अमितेष कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०१ संदिप सिंह गिल्ल, सह. पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके तसेच पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, राकेश गुजर, रेवण कंचे, अशोक माने, मयुर भोसले, गणेश काठे, महावीर वलटे, आशिष खरात, मोरे, पाटील, शेरखाने, अर्जुन थोरात, बाबर यांनी ही कारवाई केली.