आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महाप्रसाद वाटप, दीपोत्सवाने हनुमान जयंती उत्साहात साजरी

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ

बार्शी : ऐनापूर मारुती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी करण्यात आली.

या निमित्ताने बाजारपेठेतील व्यापारी, प्रशांत कथले मित्र परिवार व ऐनापूर मारुती मित्र मंडळाच्या वतीने २५०० भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी मंदिर परिसरातील दीपोत्सव केल्यामुळे सारा परिसर प्रसन्नमय व चैतन्यमय झाला होता.

श्रींच्या गर्भगाभाऱ्यात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिराचे पुजारी सतिश गुरुलिंग स्वामी व सागर स्वामी यांनी पहाटे विधीवत पूजा केली. मंदिराच्या प्रांगणात माहेश्वरी (मारवाडी) समाजातील संदिप जाजू, देवा खटोड, जगदीश भराडिया, श्रीराम काबरा, योगेश खंडेलवाल, कमलेश हेड्डा, सोनु लोहे युवकांनी भक्ती व भजन गायन करत “जय श्रीराम – बजरंग बली की जय” च्या घोषणा देण्यात आल्या, त्यामुळे मंदिर परिसरात उत्साहाचं वातावरण दिसून आले.

मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व सुशोभीकरण सजावट राम डोंबे व दादा कोरे यांच्या वतीने करण्यात आली होती. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी राजाभाऊ जोशी, बापू धारूरकर, बाळासाहेब श्रीश्रीमाळ, शुभम बाळवणे, मधुर कथले, प्रसाद गंधे, आप्पा घबाडे, सौरभ घोंगडे, प्रतिक कथले, प्रथमेश बेळे, गौरीशंकर मुलगे, संकेत लाड, राजाभाऊ गोसावी, हितेश परमार, शिवम पटेल, प्रतिक जोशी, आक्षय देवकर, सुरज मुकरे, राज भाटे, आथर्व धारूरकर यांनी परिश्रम घेतले.