आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जैन विधवा, विधुर व घटस्फोटितांचे परिचय संमेलन 26 मे ला पुण्यात

Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल

पुणे : भारतीय जैन संघटना, पुणे शहर तर्फे जैन विधवा, विधुर व घटस्फोटित परिचय संमेलन 26 मे रोजी पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.

ह्या संमेलनात सर्व जैन पंथांच्या विधवा, विधुर व घटस्फोटित पुनर्विवाहेच्छुक सहभागी होऊ शकतात. ह्या श्रेणीतील युवती उमेदवारांबरोबर विवाह करण्यास तयार असणाऱ्या 30 वर्षांपेक्षा अधिक वयाचे अविवाहित जैन पदवीधर युवक ही ह्या संमेलनात भाग घेऊ शकतात.

संमेलनात फक्त महाराष्ट्रातील जैन युवक सहभागी होऊ शकतात. हे परिचय संमेलन रविवार दि. 26 मे 2024 रोजी महावीर प्रतिष्ठान, सॅलिसबरी पार्क, पुणे येथे होणार आहे. संमेलनासाठी नावनोंदणी फक्त ऑनलाईन https://bjsindia.org/BjsMatrimonial/ हया वेबसाईटवर होईल.

नावनोंदणीची मुदत 15 मे 2024 पर्यंत असुन फी रु. 1500/- आहे. प्रवेश मर्यादित. उमेदवाराबरोबर परिवारातील दोन सदस्य उपस्थित राहू शकतात. अधिक माहितीसाठी श्रीपाल ललवाणी 9823977472, विजय पारख 9822424316, नितीन शहा 9604913296, सुभाष बोरा 9922444419, संतोष भन्साळी 9420480533, अजय ललवाणी 9822290250, अभय मुनोत 9823353566 येथे संपर्क साधावा.