श्रीराम मंदिर संस्थान तर्फे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : गरजू रुग्णांसाठी रक्ताची गरज ओळखुन व सामाजिक उपक्रम म्हणुन श्रीराम मंदीर संस्थानच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये ५० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले.
शिबीराचे उद्घाटन सुधिर देशमुख, सुरेश नाईकवाडी, विलासराव देशमुख, दत्त देशमुख, श्रीकृष्ण पाटील, प्रशांत बुरटे रत्नाकर आरगडे, मनिष राजोपाध्ये, अभिजीत मुळे यांच्या उपस्थितीत झाले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू वाटप करण्यात आले. यासाठी भगवंत ब्लड बँक बार्शी यांचे सहकार्य लाभले. यासाठी श्रीराम मंदीर समितीने परिश्रम घेतले.
