महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
देहरादून : इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी देहरादून येथे नुकत्याच झालेल्या दीक्षान्त समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिक येथील यश सुमेरकुमार काले (आयएफएस) यांना ‘सर्वोत्तम संवाद व वक्तृत्व कौशल्य प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यश काले हे माजी अपर राज्य कर आयुक्त तथा विक्रीकर न्यायाधिकरण सदस्य सुमेरकुमार काले व महामंत्री गजपंथा सिद्धक्षेत्र सुवर्णा काले यांचे सुपुत्र आहेत.
