आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पूना रिव्हरसाइड राऊंड टेबल इंडिया 105 तर्फे ॲम्ब्युलन्ससाठी मदत

Spread the love

पुणे : पूना रिव्हरसाइड राऊंड टेबल इंडिया 105 (PRRT105) ने दळवी मेडिकल फाउंडेशनच्या हॉस्पिटलला 8 लाख रुपयांची नवीन ॲम्ब्युलन्स व्हॅन खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले आहे. राउंड टेबल इंडियाच्या H.E.A.L (हेल्थकेअर एन्हांसमेंट फॉर ॲक्टिव्ह लिव्हिंग) नावाच्या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि सुलभता वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

राउंड टेबल इंडिया 105 ने या वर्षी रुग्णवाहिकेसाठी मदत केलेले हे दुसरे रुग्णालय आहे. रुग्णवाहिका व्हॅनच्या उद्घाटन समारंभाला PRRT105 चे चेअरमेन परेश लोढा, प्रथम महिला दिशा लोढा, प्रमुख देणगीदार राजेश कोकणे, डिंपल कोकणे, आणि पिपलफायची टीम, तसेच डॉ. दळवी आणि इतर राउंड टेबल इंडियाच्या मान्यवर सदस्यांची उपस्थिती होती.

राऊंड टेबल इंडियाच्या राष्ट्रीय उपक्रम H.E.A.L (हेल्थकेअर एन्हांसमेंट फॉर ॲक्टिव्ह लिव्हिंग) अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढवणे हा आहे. डिसेंबर 2023 पर्यंत 20 प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित झाले आहेत आणि रु.100 कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे.

H.E.A.L प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.