खडकी शिक्षण संस्थेतर्फे उन्हाळी शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल
पुणे : विद्यार्थ्यांनी बालवयातच स्वतःमधील कलागुणांना ओळखून स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करायचा असतो. यासाठी ‘स्व’ओळखणे आवश्यक असते. स्वतःचा ‘स्व’ अशा शिबिरांच्या माध्यमातून शोधता येतो आणि या शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो, असे मत सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.
खडकी शिक्षण संस्था आयोजित उन्हाळी शिबिराच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, इस्कॉन संस्थेचे प्रमुख संजय भोसले, सचिव आनंद छाजेड, विश्वस्त रमेश अवस्थे, मधुकर टिळेकर, सुधीर फेंगसे, सहसचिव प्राचार्य डॉ. संजय चाकणे, मुख्याध्यापिका ललिता काकडे, मुख्याध्यापक मोहन लोणकर, मुख्याध्यापिका शुभांगी बरेल्लू, डॉ गजानन आहेर जयश्री माकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले की, संस्थेने विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि खडकी दापोडी बोपोडी या परिसरातील गरीब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरामधून विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही. विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवण आणि नाश्त्याची सोय देखील केलेली आहे. सदर शिबिरामध्ये चित्रकला, नेमबाजी, वैज्ञानिक प्रयोग, रद्दीपासून कागद निर्मिती, संस्कृती कार्यक्रम, रेडिओ जॉकी प्रशिक्षण, हॉकी आणि फुटबॉल या खेळांचे देखील प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या शिबिरामध्ये २५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्था सचिव आनंद छाजेड यांनी केले. यावेळी प्रा वैशाली वाघ, प्रा महादेव रोकडे, बाबा गायकवाड, गिरीश ननावरे, स्वामी राज भिसे उपस्थित होते.
