आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ

Spread the love

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

पुणे : देशाच्या विकासात जैन समाजाचे मोठे योगदान आहे. परंपरेने हा समाज आमच्या महायुतीच्या पाठीशी आहे. जैन समाजाच्या विकासासाठी हे सरकार नेहमीच कटिवद्ध राहील. जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापण्याचा निर्णय सरकार घेईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाने रविवारी आयोजित केलेल्या ‘जैन जागृती अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हॉकी स्टेडियमसमोरील कॉलनीत हा कार्यक्रम झाला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, व्यापारी उद्योजकांना कोणत्याही अडचणी आल्यास तुम्ही थेट माझ्याशी संपर्क करा. कोणतीही अडचण तुम्हाला भासू देणार नाही. राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूरच्या विकासात जैन समाजाचे योगदान मोठे आहे.

महायुती सरकार नेहमीच जैन समाजाच्या पाठीशी उभे राहील. अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नरेंद्र ओसवाल, कांतीलाल ओसवाल, संदीप भंडारी, राजेंद्र ओसवाल, जवाहर गांधी, अमृत शहा उपस्थित होते.