महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : श्री पूना गुजराती बंधू समाज, दि पूना गुजराती केळवणी मंडळ व महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ या सामाजिक, शैक्षणीक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाचे औचित्य साधून एच. व्ही. देसाई कॉलेज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी व मुकुंद भुवन ट्रस्टचे प्रमुख पुरुषोत्तम लोहिया व दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष व श्री पूना गुजराती बंधू समाजचे मॅनेजिंग ट्रस्टी राजेश शहा यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
रक्तदान शिबिराचे संचालन पूना हॉस्पिटल च्या राकेश जैन मेमोरिअल ब्लड सेंटर या रक्त पेढी मार्फत करण्यात आले. त्यांचे डॉक्टर्स व तंत्रज्ञ यांनी शिबिराचे संचालन उत्तम पद्धतीने हाताळले. शिबिराच्या सुरुवातीलाच धवल शहा यांनी स्वतः रक्तदान करून कार्यक्रमाची उत्तमरित्या सुरुवात करून दिली.
या शिबिरात एकूण १२२ बॅग रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान झाल्यानंतर सर्व रक्तदात्यांना रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेत नैनेश नंदू, राजेंद्र शहा, केतन कपाडिया, वल्लभ पटेल, जनक शहा, हेमंत मणियार, दिलीप जगड, विनोद देडिया, संदीप शहा, माधुरीनेन शहा, शरद श्राफ इत्यादी द पूना गुजराती बंधू समाज व द पूना गुजराती केळवणी मंडळाचे ट्रस्टी व पदाधिकारी यांचा सहभाग आहे.
