आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयामध्ये निरोप समारंभ संपन्न

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल

भूम : आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय.पाटील औषधनिर्माण महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षातील पदविका, पदवी व पदव्युत्तर या तिन्ही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे, उपप्राचार्य डॉ. शिल्पा चौधरी, प्राध्यापक डॉ. रमेश काटेदेशमुख आणि समन्वयक डॉ. शुभांगी दसवडकर, डॉ. सारिका निकम व्यासपीठावर उपस्थित होते.

या वेळी टेक्निकल मॅगझिन चे प्रकाशन करण्यात आले. उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार तसेच विविध स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या ‌विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रशस्ती पत्रक देवून गौरविण्यात आले.

यावेळी डॉ. नीरज व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना पुढील जीवनात यशस्वी होण्यासाठी जबाबदारी घेणे आणि नैतिक तत्वे जपणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन केले तसेच कोणत्याही ठिकाणी काम करण्याची तयारी ठेवावी असे सांगितले.

आजच्या बदलत्या उद्योग विश्वात व भावी फार्मसिस्ट यांच्या जबाबदाऱ्या यावर प्रकाश टाकला आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी व्‍यावसायिक जीवनासाठी शुभेच्या दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करीत आठवणींना उजाळा दिला.

या निरोप समारंभ कार्यक्रमात डी.फार्मसी मधून प्राची धोंडे, बी. फार्मसी मधून डोलिसा जैन तर एम. फार्मसी मधून स्नेहल गायकवाड यांना “सर्वोत्कृष्ट विद्यार्थी” पुरस्कार देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुतिका धुमाळे आणि सानिका पाटील यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यानी तसेच डॉ. शुभांगी दसवडकर, प्रा. सारिका निकम आणि प्रा. मुकेश मोहिते यांनी लक्षणीय परिश्रम घेतले.