आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रत्नमाला गॅस एजन्सीने केली ग्राहकांची फसवणूक

Spread the love

आष्टा ग्रामस्थांचा आरोप, कारवाईची मागणी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल

भूम : भूम येथील रत्नमाला गॅस एजन्सीने नि:शुल्क तपासणी करणे अपेक्षित असताना प्रत्येक ग्राहकाकडून २३६ रुपये घेऊन भ्रष्टाचार केला असून ग्राहकांची फसवणूक केल्यामुळे गुन्हा दाखल करावा. अशी मागणी आष्टा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

भुम येथील रत्नमाला गॅस एजन्सीने यापद्धतीची वसुली भूम शहर व भूम तालुक्यातील बऱ्याच गावात मागील पंधरा दिवसापासून केलेली आहे. याबाबत ग्रामस्थांनी इण्डेन गॅस हेड ऑफिस छत्रपती संभाजी नगर येथे फोनवरून चौकशी केली असता फक्त पाईप रेपिरिंग व इतर मेंटेनन्स असेल तरच संबंधित शुल्क आकारण्यात यावे असा आदेश दिला आहे.

परंतु त्यांनी पाठवलेल्या कर्मचाऱ्याचे सर्व बिलबुक तपासले असता त्यांनी भूम शहरातील व भूम तालुक्यातील इतर गावामधून प्रत्येक धारकाकडून २३६ रुपये शुल्क वसूल केले आहे. रत्नमाला गॅस एजन्सीची सखोल चौकशी करून कायदेशीर कार्यवाही व दोषी आढळल्यास संबंधिताचे लायसन्स तात्काळ रद्द करावे.

तसेच, रत्नमाला गॅस कडून बेकायदेशीररित्या वसूल केलेली फीस सर्व गॅस धारकांना परत मिळून द्यावी व या विषयावर कार्यवाही न झाल्यास तालुकास्तरीय आंदोलन तहसील कार्यालयासमोर करण्यात येईल याची नोंद घ्यावी.अशी लेखी तक्रार अभिजित चंद्रकांत काकडे गॅस धारकांनी तहसीलदार भुम व उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांना दिली आहे.