आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

एक वर्षापासुन फरार अजय शेलारला अटक

Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

पुणे : खुनाचा प्रयत्न करून मागील एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलिसांनी केली आहे.

अजय शेलार, (वय १९ वर्षे, रा. गणेश पार्क, सच्चाइमाता, बालाजी किरणा मालाचे दुकानाजवळ, आंबेगाव बु, पुणे) याला अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हयामध्ये मागील एक वर्षापासुन फरार असलेला आरोपी अजय शेलार यांचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे शोध घेत होते.

पोलीस अंमलदार विक्रम सावंत, राहुल तांबे यांना माहिती मिळाली की आरोपी हा कात्रज स्मशान भुमी समोरील पुलाखालील बाजुस आला आहे. या माहितीनुसार लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी या ठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नंदीनी वग्याणी, यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, मोहन कळमकर, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, निलेश जमदाडे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हनमंत मासाळ, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.