आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मौजमजेसाठी मोटारसायकली चोरणारा चोरटा जाळ्यात

Spread the love

१३ दुचाकी मोटारसायकल जप्त

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

पुणे : मौजमजा करण्यासाठी मोटारसायकल चोरणाऱ्या अट्टल चोरटयास अटक करण्यात फरासखाना पोलीसांना यश आले आहे.

या प्रकरणी दिलीप चौधरी (वय-२३ वर्षे, रा.मु.पो. निटुर, साधनाथ मंदीराशेजारी, ता. निलंगा, जि. लातुर) त्याच्याकडून १३ दुचाकी मोटारसायकल जप्त केल्या आहेत. तपास पथकातील पोलीस अंमलदार हे नेहरु चौक भाजी मार्केट भागात पेट्रोलींग करत होते.

पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार हे वाहन चोरीच्या गुन्हेगारांसाठी वारंवार सी.सी.टी.व्ही कॅमेरे चेक करत होते. सी.सी.टी.व्ही फुटेज मधील वर्णनाप्रमाणे एक मिळता-जुळता व्यक्ती नेहरु चौक, भाजी मार्केट येथे आला असल्याची माहिती पोलीस अंमलदार समीर माळवदकर यांना मिळाली.

त्याला ताब्यात घेऊन फरासखाना पोलीस स्टेशन येथे आणुन त्याची चौकशी करता त्याने गुन्हा कबुल केला. तसेच फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील रविवार पेठ, नेहरु चौक भाजी मार्केट, मंडई परिसरातुन मोटारसायकली चोरी केल्याचे सांगुन चोरलेल्या दुचाकी मोटार सायकल त्याच्या मुळगावी ठेवल्या असल्याचेही त्याने यावेळी कबुल केले.

त्याच्या मुळगावी जाऊन शिरुर आनंतपाळ पोलीस स्टेशन कडील स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार एस.एस. शिंदे यांची मदत घेऊन फरासखाना पोलीस स्टेशन कडील सहायक पोलीस निरीक्षक, वैभव गायकवाड, व पोलीस अंमलदार यांनी १३ दुचाकी मोटारसायकल जप्त केल्या.

आरोपी हा सन २०२१ पासुन वाहन चोरी करत असल्याचे दिसुन आले आहे. त्याच्याविरुद्ध फरासखाना पोलीस स्टेशन येथे ७ गुन्हे, कोथरुड पोलीस स्टेशन २ गुन्हे, चतुः श्रृंगी पोलीस स्टेशन १ गुन्हा, विश्रामबाग पोलीस स्टेशन ३ गुन्हे असे एकुण १३ गुन्हयातील मोटार सायकल आरोपी याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ संदीपसिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग रुक्मिणी गलंडे यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), अजित जाधव, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी, राकेश क्षीरसागर, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, सुमित खुट्टे, संदीप कांबळे, मेहबुब मोकाशी, प्रमोद मोहीते, गणेश आटोळे, शशीकांत ननावरे, तुषार खडके, अजित शिंदे यांच्या पथकाने केली आहे.