आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जैन बोर्डिंग फेडरेशनतर्फे १२ मे ला वार्षिक स्नेहसंमेलन

Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

मुंबई : जैन बोर्डिंग फेडरेशनच्या वतीने त्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक १२ मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता कांदिवली (पूर्व) येथील तेरापंथ सभागृहात हे संमेलन होणार आहे.

या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये जैन बोर्डिंग फेडरेशनच्या कामाची ओळख करून दिली जाईल आणि त्यांची उद्दिष्टे आणि ध्येय स्पष्ट केली जाणार आहेत. या प्रसंगी डाॅ. बिपीन जोशी, डाॅ. विनय जैन, हितेश दोशी, गिरीश शहा, चंद्रकांत गोगरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत.

बोर्डिंग स्कूल्सला येणाऱ्या विविध अडचणी, त्यांच्या पुढील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना यावर चर्चा केली जाणार आहे. जैन बोर्डिंग फेडरेशनच्या माध्यमातून वसतीगृह, तेथील सुविधा, शाळा, धर्मशाळा, स्थानक, विहारधाम येथील विविध गरजांकडे लक्ष देणारी संस्था आहे.

त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी ही संस्था कटिबद्ध आहे. आधुनिक शिक्षण आणि धार्मिक संस्कार यांच्या एकत्रित मिलाफातून २५ हजारांहून अधिक गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे लक्ष या संस्थेने ठेवले आहे.

उपलब्ध असणारे विविध स्रोत, दानशूर आणि ज्यांना खरोखरीच गरज आहे असे अशांमध्ये दुवा प्रस्थापित करण्याचे काम या फेडरेशनच्या माध्यमातून केले जात आहे. ४०० हून अधिक जैन नेते आणि सहभागीदार यांच्या समवेत विविध कल्पनांचे आदानप्रदान आणि त्यांच्याकडून चांगल्या सहयोगासाठी प्रयत्न केले जातील. या स्नेहमेळाव्यासाठी सर्व सहभागीदार, कम्युनिटी लिडर्स, शिक्षणतज्ज्ञ, पाठीराखे या सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.